ऑलंपिक रग्बी पात्रता फेरीसाठी कोल्हापूरच्या वैष्णवी पाटीलची भारतीय संघात वर्णी

0
95

कोल्हापूर : ओसाका (जपान) येथे १८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ऑलंपिक रग्बी पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरला आहे. या संघात पाडळी(ता. करवीर) कोल्हापूरची कन्या वैष्णवी दत्तात्रय पाटील हीची निवड झाली आहे.

या पात्रता फेरीत भारताचा मुकाबला चीन, जपान, हाॅंगकाँग, घूम, कजाकिस्तान आदी बलाढ्य संघाशी होणार आहे.

या पात्रता फेरीतील स्पर्धेसाठी भारतीय रग्बी संघाने कोलकत्ता येथील नेताजी सुभाष सेंटरमध्ये ५ ते १५ नोव्हेंबर दरम्यान निवड चाचणी शिबीर आयोजित केले होते. या शिबीरात देशातील १७ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली होती.

यात कोल्हापूरच्या कल्याणी पाटील व वैष्णवी पाटील यांचा समावेश होता. दक्षिण आफ्रीकेचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक लुध्रीक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सराव शिबीरातून वैष्णवीची १२ जणांच्या संघात निवड झाली.

निवड झालेल्या संघात शिखा यादव, गोमती (दिल्ली), दुमणी मरांडी, तरूलता नाईक, हुपी माझी, निर्मल्या रावत, वैष्णवी पाटील, उज्वला घुगे (महाराष्ट्र), चॅनेल ग्रिझले (ओडीसा), संध्या राय (पश्चिम बंगाल), यांचा समावेश आहे.

वैष्णवी न्यू काॅलेजची विद्यार्थीनी असून तिला पेट्रन इन चिफ मालोजीराजे, मधुरिमाराजे यांचे प्रोत्साहन, तर प्रशिक्षक दीपक पाटील, रग्बी जिल्हा अध्यक्ष प्रा. अमर सासने, प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here