अफेअरच्या चर्चा, ८ वेळा ब्रेकअप अन्…; आता १३ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करतोय आदित्य रॉय कपूर

0
63

आशिकी 2’मध्ये त्याला पाहून अख्खी तरूणाई त्याची ‘दीवानी’ झाली होती. आम्ही कोणाबद्दल बोलतोय हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. त्याचं नाव आदित्य रॉय कपूर…आज त्याचा वाढदिवस. आदित्य रॉय कपूर यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाला.

३७ वर्षीय आदित्य हा सिद्धार्थ आणि कुणाल कपूर यांचा धाकटा भाऊ आहे आणि विद्या बालनचा दीर आहे. आदित्यने 2009 मध्ये ‘लंडन ड्रीम्स’ मधून करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर 2013 मध्ये ‘आशिकी 2’ या चित्रपटाद्वारे त्याला प्रसिद्धी मिळाली.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे तो सध्या चर्चेत आहे. नुकतेच दोघेही एका पार्टीत हातात हात घालून एकत्र दिसले. अनन्या आदित्यपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे.

अनन्यांच्या आधी आदित्यचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडल्या गेलं. सर्वप्रथम आदित्य हेमा मालिनी आणि धर्मेन्द्र यांची लाडकी लेक अहाना देओल हिच्या प्रेमात होतो.

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी दोघंही रिलेशनशिपमध्ये होते,असं म्हणतात. त्यावेळी आदित्य एका टीव्ही चॅनलमध्ये नोकरी करत होता आणि तो आहानाला वेळ देऊ शकत नव्हता. कदाचित याच कारणामुळे दोघांचं ब्रेकअप झालं.

रिया चक्रवर्तीसोबतही आदित्यचं अफेअर होता. 2011 मध्ये दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. सुमारे वर्षभर दोघांनीही एकमेकांना डेट केलं. पण आशिकी 2 च्या सेटवर आदित्यच्या आयुष्यात एक नवी सुंदरी आली आणि रियासोबत त्याचं ब्रेकअप झालं.

‘आशिकी 2’नंतर आदित्यच्या आयुष्यात श्रद्धा कपूर आली. त्यावेळी अनेकदा दोघंही एकत्र दिसतं. पण 2015 साली दोघांचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपमागचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. चर्चा खरी मानाल तर श्रद्धा कपूरची फरहान अख्तरसोबतची वाढती जवळीक या ब्रेकअपला कारणीभूत ठरली. मध्यंतरी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट Marianna Mukuchyan हिच्यासोबतही आदित्यचं नाव जोडलं गेलं. काहींच्या मते, अर्थातच या अफवा होत्या. दोघंही चांगले मित्र आहेत. यापेक्षा त्यांच्यात काहीही नव्हतं.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्यच्या रोमान्सच्या बातम्याही दीर्घकाळ चर्चेत राहिल्या. दोघांनीही फितूर नावाचा एक सिनेमा केला होता. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. अभिनेत्री निधी अग्रवालसोबत आदित्यने एकही सिनेमा केलेला नाही. पण जिममध्ये दोघेही सतत एकत्र दिसत. यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा पसरल्या होत्या.

आदित्यचं नाव सुपर मॉडेल दीवा धवनसोबतही जोडलं गेलं. दीवाने एका तरूणाला किस करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोतील तरूण अन्य कुणी नसून आदित्य असल्याचा दावा केला गेला होता. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि आदित्यच्या अफेअरच्या चर्चा किती ख-या किती खोट्या माहित नाही. पण सोनाक्षीमुळेच आदित्य व दीवा धवन यांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here