Bigg boss marathiच्या थीमवर आहे अमृता-प्रसादची लग्नपत्रिका; तुम्ही पाहिली का?

0
93

सध्या कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहात आहेत. यामध्येच बिग बॉस मराठी फेम अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade) ही जोडी लग्नाच्या बेडीत बांधली जाणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ही जोडी एकमेकांना डेट करु लागली.

या जोडीने जाहीरपणे एकमेकांप्रतीचं प्रेमही व्यक्त केलं. त्यामुळे अमृता आणि प्रसाद नेमकं लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. यामध्येच आता या जोडीने त्यांची लग्नपत्रिका शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अमृता आणि प्रसाद लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी आता लग्नाच्या गडबडीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडीच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर आता नुकताच त्यांचा ग्रहमखदेखील झाला आहे. याच दरम्यान, अमृताने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.

काय आहे पत्रिकेत खास?

अमृता आणि प्रसाद यांची लग्नपत्रिका खास आणि हटके आहे. कारण, बिग बॉसच्या घरात त्यांची मैत्री झाली आणि इथूनच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरु झाला. त्यामुळे त्यांनी लग्नपत्रिकेतही बिग बॉसच्या घराची झलक दाखवली आहे. सोबत अमृताने स्वत: केलेली कवितादेखील या पत्रिकेत पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here