आजरा तालुक्यातील घनसाळ तांदूळ जातीचा जन्म झालेल्या दाभिल या गावी भेट देत आमदार प्रकाश आबीटकरानी ”घनसाळ” भात शेतीची केली पहाणी केली

0
119

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर: दैनंदिन आहारामध्ये तांदळाचे अनन्य साधारण महत्व आहे. यामध्ये पुर्वापार चालत आलेल्या जुन्या भाताच्या जाती आपण पाहत आलो आहोत. परंतु कालपरत्वे सुगंध युक्त भात आहारामध्ये असल्यास जेवण अधिक तृप्त होते.

यामध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या घनसाळ जातीचा होतो. आजरा तालुक्यातील दाभिल या गावी घनसाळ जातीचा जन्म झाला पुढे ती आजऱ्यासह कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र व देशभरामध्ये ही भाताची जात ”आजरा घनसाळ” म्हणून नावारुपास आली.

परंतू ज्या पध्दतीने या तांदळाचे मार्केटींग करणे गरजेचे असताना तसे न झाल्यामुळे काही व्यापारी मंडळींनी अन्य जातीचा व कर्नाटक राज्यातील सेंटेड तांदूळ आजरा घनसाळ म्हणून विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे घनसाळ म्हणून मुळ ओळख असलेल्या आजरा घनसाळ तांदळाची पिढेहाट होताना दिसत आहे.


याकरीता आमदार प्रकाश आबीटकर यांनी आजरा तालुक्यातील दाभिल गावी भेट घेऊन घनसाळ उत्पादन करणारे शेतकरी व ग्रामस्थ यांचेसमवेत शिवार भेट देत घनसाळ शेतीची पहाणी केली.

सेंद्रीय पध्द्तीने पिकवलेला घनसाळ हा खाण्यासाठी खमंग व दर्जेदार असून सर्वांनाच आहारामध्ये हवा-हवासा वाटतो. त्याची प्रचार प्रसिध्दी व ब्रँडींग करण्यावर कृषि विभागाने भर देण्याबाबतच्या सुचना यावेळी आमदार प्रकाश आबीटकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here