सत्तर पोलिस जखमी झाले, ते पाय घसरुन पडले का?, छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार

0
73

जालना- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे.

आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात जालना येथे ओबीसी समाजाचा मेळावा झाला.ल यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.

दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

अंतरवली सराटी येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरुन जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केले. छगन भुजबळ म्हणाले, पोलिसांचा लाठिचार्ज सगळ्यांनी पाहिला आहे. सत्तर महिला पोलिसांसहीत दगडांचा मार खाऊन रुग्णालयात दाखल झाले.

त्यांची तब्येत बिघडली म्हणून पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी विनंती केली. पण, यांनी अगोदरच तयारी केली होती. त्या पोलिसांना त्यांनी अचानक दगडांचा मारा केला. पोलिस काय पाय घसरुन पडले का? असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

“पोलिसांवर तुम्ही हल्ला केला. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे तो बघा यात सगळं दिसत आहे, असंही भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, मंडल आयोगाने देशभर फिरून ओबीसी यांची संख्या ५४ टक्के असल्याने त्यांना २७ टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली.

तो आयोग तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला. त्याची अंमलबाजवणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना केली. त्यांच्या हातात कोणाला आरक्षण देयचे नव्हते, यामुळे त्यांनी कोणाला आरक्षणापासून वंचित ठेवले, असा होत नसल्याचा खुलासा मंत्री भुजबळ यांनी आज केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here