तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार

0
68

कोल्हापूर : त्यांच्याकडे एकवेळ जेवणासाठी पैसे नव्हते, त्यांनी गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले, त्यामुळेच त्यांना जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली, असा जोरदार हल्ला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापूर येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला.

कोट्यवधींची संपत्ती आली कोठून?
आम्ही आमच्या कष्टाचे खातो. घाम गाळतो. एक दिवसाच्या जेवणासाठी पैसे नव्हते, अशी तुमची परिस्थिती होती. आज तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून? असा सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

मीही त्यांना सोडणार नाही…
काहीही गरज नसताना मंत्री भुजबळ माझ्यावर बोलत आहेत. ते काहीतरी उकरून काढत असतील तर मीही त्यांना सोडणार नाही. भुजबळ यांना राज्यात जातीय तेढ निर्माण करायची आहे. सरकारने त्यांना बोलायचे बंद करावे, अन्यथा आमचाही
नाइलाज होईल. – मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

शाहू छत्रपती, संभाजीराजे व्यासपीठावर
कोल्हापूर ही आरक्षणाची जनकभूमी मानली जाते. आजच्या सभेवेळी राजघराण्याचे वारसदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे व्यासपीठावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here