आंबा तालुका शाहूवाडी अल्पावधीत पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले व प्रसिद्ध झालेले पर्यटन स्थळ आहे. कोल्हापूर सांगली तसेच पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरातून सुद्धा अनेक लोक आपापल्या कुटुंबीयांसह तसेच अनेक तरुण आपापल्या मित्रमंडळींसह आंबा परिसरात पर्यटनासाठी दाखल झालेले आहेत.
दिवाळी संपल्यानंतर मुलांना शाळा कॉलेजेस ना असलेल्या सुट्ट्यांमुळे दरवर्षी या परिसरात फिरण्यासाठी लोकांची गर्दी होत असते , दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबा गावात आजूबाजूच्या परिसरातील सव्वाशे ते दीडशे च्या आसपास असणारे रिसॉर्टस फुल्ल झालेले आहेत.
सध्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कुटुंबीयांसह अनेक लोक या परिसरात दाखल झालेले आहेत. सफारीसाठी रिसॉर्ट्स कडून उपलब्ध करून दिलेल्या गाड्यांच्या टपावर बसून पावनखिंड विशाळगड, परिसरात पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहे.
या परिसरात अगदी वाजवी दरापासून ते उच्च सोयी असलेल्या महागड्या हॉटेलपर्यंत सर्व सुविधा आंबा परिसरात रिसॉर्ट च्या माध्यमातून उपलब्ध आहेत लोक आपापल्या आवडीनिवडी नुसार राहणे पसंत करतात.
आंबा परिसर हा घनदाट जंगलांनी वेढलेला आहे त्यामुळे पावनखिंड विशाळगड ला जाताना निसर्ग पर्यटनाचाही आनंद लुटता येतो. तसेच वाघ झरा , मानोली डॅम , आंबा देवराई ,आंबा घाट ही ठिकाणे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. अनेक रिसॉर्ट्स मध्ये कराओके सिस्टीम , रेन डान्स , लहानग्यांसाठी राइड्स , स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
