मुरगुड येथे देवगड निपाणी राज्य मार्गावर ऊसदर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच रस्ता रोको आंदोलन

0
96

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

मुरगुड :कारखानदारांनी ऊसाला यंदाच्या हंगामात ३५००रूपये भाव व मागील वर्षीच्या हंगामातील ४००रुपयेचा हफ्ता देण्यात यावा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुरगुड येथे देवगड निपाणी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन वाहतूक रोखण्यात आली.

तब्बल तासभर आंदोलकांनी रस्ता रोखल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मुरगुड परिसरातील चिमगांव सह भडगांव शिंदेवाडी, मळगे,कुरुकली, गावांतील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here