SP9/ कोकरूड प्रतापराव शिंदे
अंत्री ब्रुद्रक ता. शिराळा गावचे सुपुत्र व अमरदीप शिक्षण संस्था भाईंदरचे संस्थापक पै. वसंतराव यशवंत पाटील यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘ दि प्राईड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्काराचे वितरण संत शिरोमनी रोहिदास महाराज सभागृह महाड जि. रायगड येथे करण्यात आले.
यावेळी सातारा डीसीसीचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र सरकाले, महाबळेश्वर येथील मुख्याधिकारी योगेश पाटील, शिवसेना प्रवक्ता नितीन पावले, सामाजिक कार्यकर्त्या निता शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पै. वसंतराव पाटील यांनी मिरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या सहकार्याने श्री. गणेश कुस्ती आखाड्याची स्थापना केली. या माध्यमातून कुस्ती खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन देण्याचे काम ते करित आहेत.
या तालमील अनेक पैलवानांनी जिल्हा, राज्य राष्ट्रीय स्पधेॅत यश मिळवले आहे. पै.वसंतराव पाटील हे सामाजिक बांधिलकी भावनेतून राबवित असलेल्या क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल वसंतराव पाटील यांचे शिराळा तालुक्यातून विशेष अभिनंदन होत आहे.