‘तारक मेहता…’मध्ये झळकलेली ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील उमा, तुम्हाला माहितीये का?

0
64

‘सारं काही तिच्यासाठी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. दोन बहिणींच्या अतूट नात्याची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात.

‘सारं काही तिच्यासाठी’मधील उमा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलीशी वाटते. उमा या भूमिकेमुळे अभिनेत्री खुशबू तावडेलाही चाहत्यांचं विशेष प्रेम मिळत आहे. खुशबूने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेमुळे तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं आहे.

२०११ साली ‘एक मोहोर अबोल’ या मालिकेतून खुशबूने टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर ‘धर्मकन्या’, ‘आम्ही दोघी’ या मालिकांमध्ये खुशबू प्रमुख भूमिका साकारताना दिसली.

मराठीबरोबरच खुशबूने हिंदीमध्ये काम केलं आहे. ‘तेरे बिन’ या हिंदी मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर अतिशय गाजलेल्या आणि लोकप्रिय अशा ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतही खुशबू झळकली होती. आज टेलिव्हिजन दिवसानिमित्त खुशबूने तिच्या टीव्ही विश्वातील प्रवासाबाबत पोस्ट शेअर केली आहे.

खुशबूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीव्ही मालिकांचे पोस्टर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. “२०११ पासून ते २०२३ पर्यंत…मोहोरपासून ते उमापर्यंत…तुम्ही मला खूप काही दिलं…नेहमीच ऋणी राहीन…वर्ल्ड टेलिव्हिजन डेच्या शुभेच्छा”, असं खुशबूने पोस्टमध्ये लिहलं आहे. गेली जवळपास १२ वर्ष खुशबू प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे.

दरम्यान खुशबूचा नवरादेखील लोकप्रिय अभिनेता आहे. संग्राम साळवी आणि खुशबूने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांना एक मुलगादेखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here