लग्नात रसगुल्ल्यावरून तुफान राडा; कमी पडताच जोरदार हाणामारी, 6 जण जखमी

0
53

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने परिस्थिती इतकी बिघडली की थेट हाणामारी झाली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले. या भांडणात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील शमसाबाद भागात ही घटना घडली. शमसाबाद पोलीस स्टेशन प्रभारी अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसारस ब्रृजभान कुशवाह यांच्या घरी लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान कोणीतरी रसगुल्ला कमी पडले यावरून टीका केली. यावरून वाद इतका वाढला की लग्न समारंभात हाणामारी झाली आणि 6 जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान देवी, योगेश, मनोज, कैलास, धर्मेंद्र आणि पवन हे जखमी झाले आहेत. शमसाबाद हे आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील एक शहर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एत्मादपूरमध्ये एका लग्नात मिठाई न मिळाल्याने झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

2014 मध्ये कानपूर देहातच्या कुरमापूर गावात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. उन्नावमधील एका गावातून लग्नाची वरात आली होती.लग्नाच्या वेळी वराचा चुलत भाऊ मनोजला त्याच्या ताटात दोन रसगुल्ले घ्यायचे होते. मात्र मुलीच्या बाजूने कोणीतरी त्याला एकच रसगुल्ला घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली.

मुलीने लग्नास दिला नकार

लग्नाची वरात आली तेव्हा सर्व काही ठीक चाललं होतं. पण नंतर रसगुल्ल्यावरून झालेल्या भांडणामुळे लग्न मोडलं. हा वाद इतका वाढला की लग्नात पाहुणे आणि घरची मंडळी यांच्यात हाणामारी झाली. दरम्यान, मुलाच्या बाजूने मुलीच्या वडिलांनाही शिवीगाळ केली. ही घटना तरुणीला कळल्यावर तिने लग्नास नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here