Kolhapur: मधमाश्यांच्या हल्ल्यात चंदगड पंचायत समितीच्या माजी सभापतींचा मृत्यू

0
66

चंदगड: राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक व चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन दोडकल्लाप्पा कांबळे (वय ८५) यांचा मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

कांबळे हे गावाशेजारील डोणी नावाच्या शेताकडे गेले होते. यावेळी मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. जखमी कांबळे यांना कोवाडच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना बेळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here