SP9/ कोकरूड प्रतिनिधी
सोनी मराठी वाहीनी सध्या गाजत असलेली प्रसिद्ध मालिका गाथा नवनाथांची या मालिकेतील मच्छिंद्रनाथ महाराज यांची भूमिका साकारनारे अभिनेते
जयेश शेवलकर, गोरक्षनाथ महाराज आणि महादेव यांची भूमिका साकारनारे अभिनेते नकुल घाणेकर यांनी एकादशी निमित्ताने शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिरास भेट दिली.
यावेळी शिराळा तालुक्याच्या वतीने भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह चव्हाण , पत्रकार प्रतापराव शिंदे व शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन सदाशिव पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अभिनेते जयेश शेवलकर म्हणाले की, एकादशी आणि गोरक्षनाथ प्रकट दिनानिमित्त गोरक्षनाथ महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या शिराळा भूमितील गोरक्षनाथ महाराज मंदिरात येवून गोरक्षनाथांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो
. त्यांच्या जीवणावरील साकारण्याऱ्या गाथा नवनाथांची ही मालिका लोकांना आवडली असून लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. याप्रसंगी सोनी मराठीचे ओमकार चांदे, राज राजशेखर, प्राची वाळुंज, अभिनेते विनायक चव्हाण, विशाल पाटील, दिपक माने, विक्रांत चौगले, विठ्ठल चव्हाण, वैभव चव्हाण, विनायक कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी गोरक्षनाथ मंदिराचे आनंदनाथ महाराज यांनीही सत्कार केला.