आता वाजणार अन् गाजणार! ‘जाऊ बाई गावात’ नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या गाण्याचा टीझर आऊट

0
67

    ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) लवकरच एका नव्या कार्यक्रमात झळकणार आहे. जाऊ बाई गावात या झी मराठीच्या कार्यक्रमात तो झळकणार असून नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे.

    या प्रोमोमधून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सहा स्पर्धकांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. ‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या रिअ‍ॅलिटी शोचा आज आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमोनंतर आता शीर्षक गीताचं टीझर झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

    हार्दिक जोशीचा गावरान अंदाज ह्या टिझरमध्ये पाहायला मिळतोय. फक्त गाण्याच्या टीझरने इतकी क्रेझ निर्माण केली. त्यानंतर आता वाजणार अन् गाजणार हे गाणं भेटीला येणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here