“काय चित्रपट, काय स्टारकास्ट…”, ‘झिम्मा २’साठी सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीची पोस्ट

0
126

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ अखेर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते तो झिम्मा २ सिनेमा शुक्रवारी(२४ नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला.

झिम्मानंतर या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. प्रदर्शनाआधीच ‘झिम्मा २’ मधील गाणीही व्हायरल झाली. आता या सिनेमालाही प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ची जोरदार हवा आहे. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकरही ‘झिम्मा २’चं कौतुक करत आहेत. आता मिताली मयेकरने ‘झिम्मा २’साठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मितालीने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत ‘झिम्मा २’ सिनेमा आणि त्यातील कलाकरांचंही कौतुक केलं आहे. “काय चित्रपट, काय स्टारकास्ट, खूपच भारी…झिम्मा २ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नक्की बघा. संपूर्ण टीमचं अभिनंदन आणि शुभेच्छा”, असं मितालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करेल असा अंदाज आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सुहास जोशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here