तरुणाच्या मानेवर अन पाठीवर कोयत्याने वार, सोलापुरात गुन्हा दाखल

0
63

सोलापूर : काहीएक कारण न सांगता थेट मुलाच्या मानेवर व पाठीवर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी करण्याचा प्रकार सोलापुरातील एका कॉलेजजवळील कँटीनसमोर दुपारी २:१५ च्या सुमारास घडला.

मर्थ संतोष गुरव असे जखमी मुलाचे नाव आहे. बॉबी तळभंडारे याच्यासह अनोळखीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

यातील मुलाची आई विद्या संतोष गुरव (वय- ३८, रा. भूषण नगर, रामवाडी, सोलापूर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा समर्थ याला वरील आरोपींनी दुपारी सव्वादोनच्या सुमारास शिवदारे कॉलेज लगत असलेल्या कॅन्टीसमोर कोयत्याने मानेवर व पाठीवर वार करून जखमी केले.

पट्ट्याने, लाथाबुक्क्याने मारहाण केली. मारहाणीचे कारण सांगितले नाही. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे, तपास फौजदार पोपळभट करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here