‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे प्राजक्ता घेऊ शकली स्वत:चं घर; अभिनेत्रीचा सल्ला ठरला लाखमोलाचा

0
57

प्राजक्ता माळी (prajakta mali) हे नाव सध्या मराठी कलाविश्वात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जात आहे. अल्पावधीत प्राजक्ताने यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिच्याविषयी सोशल मीडियावर दररोज असंख्य गोष्टी चर्चिल्या जातात.

यामध्येच तिने तिच्या पहिल्या घराची गोष्ट सांगितली आहे. एका लोकप्रिय अभिनेत्री आणि लेखिकेमुळे ती स्वत:चं घर घेऊ शकली.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने प्राजक्ताला बरंच काही दिलं. त्यामुळे ही मालिका तिच्यासाठी खूप खास आहे. ही मालिका संपण्यापूर्वीच प्राजक्ताने तिचं स्वत:चं हक्काचं घर घेतलं होतं.

या घराविषयी बोलत असताना एका अभिनेत्रीच्या सल्ल्यामुळे मला घर घेणं शक्य झालं असं तिने सांगितलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेला १० वर्ष नुकतीच पूर्ण झाली त्यानिमित्ताने प्राजक्ताने या आठवणींना उजाळा दिला.

“मालिका सुरु झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यातच मधुगंधा कुलकर्णी हिने मला सांगितलं होतं की, तू फायनान्शिअली इंडिपेंडन्ट असलं पाहिजे. तुझं स्वत:चं घर पाहिजे.

तुझी स्वत:ची गाडी पाहिजे आणि तुझ्या अकाऊंटला किमान १० लाख रुपये बॅलेन्स पाहिजे. तर तू स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतेस. त्यावेळी तुला तुझ्या फॅमिलीचा निर्णय ऐकावा लागेलच असं नाही. ते स्वातंत्र्य तुला मिळेल. तिचं हे बोलणं माझ्या डोक्यात पक्क बसलं. त्यामुळे जुळून येतील रेशीमगाठी संपण्याच्या आतच मी घर घेऊ शकले”, असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मधुगंधा ताईप्रमाणेच उदय टिकेकर यांनीही इन्व्हेस्टमेंटबद्दल खूप गोष्टी सांगितल्या. त्यांनी ज्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलं त्याने खऱ्या अर्थाने आयुष्यात आणि भविष्यात टिकून राहण्यासाठी फायदा झाला.

कलाकार म्हणून आपण फायनान्शिअली, मेंटली आणि इमोशनली इनसिक्युअर असतो.पण तुमचा एक पिलर स्ट्राँग असला पाहिजे. मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन केलं. त्यामुळे कोरोना काळात मला याची जाणीव झाली. जर त्यावेळी आपण असं केलं नसतं तर कोविड काळात मला कठीण झालं असतं. त्यामुळे मी या दोघांचे मानेन तितके आभार कमी आहेत.”

दरम्यान, प्राजक्ता आज अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिका आणि व्यावसायिकादेखील आहे. तिचा प्राजक्तराज या नावाने दागिण्यांचा ब्रँड आहे. तर, तिचं स्वत:चं फार्महाऊसदेखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here