हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर! ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

0
56

‘यश राज स्पाय युनिव्हर्स’ चा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांची आवड आणि मागणी लक्षात घेऊन निर्मातेही एकापाठोपाठ एक स्पाय चित्रपट घेऊन येत आहेत. हँडसम हंक हृतिक रोशन सध्या त्याच्या ‘वॉर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

आता या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे.

हृतिक रोशन-ज्युनियर एनटीआर स्टारर ‘वॉर 2’ चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट केले आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि त्याची निर्मिती वायआरएफने केली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘वॉर 2’ चांगलाच गल्ला जमवणार असे म्हटले जात आहे.

एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण आणि टायगर 3 नंतर ‘वॉर 2’ हा YRF स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे. ‘वॉर 2’ हा 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘वॉर’चा सिक्वेल आहे. ‘वॉर’ मध्ये सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, यात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते, तर वाणी कपूर, आशुतोष राणा आणि अनुप्रिया गोएंका सहाय्यक भूमिकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here