बिद्री कारखान्याच्या निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; कार्यक्षेत्रातील १७३ केंद्रावर होणार मतदान

0
362

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : बिद्री ता कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दूरगी लढत होत आहे. रविवार दि ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारना मतदान करता येणार आहे. दरम्यान मतदान कागल , राधानगरी, भुदरगड , करवीर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील १७३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी १५०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . दरम्यान आज २ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील रामनमळा येथून संबंधित मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतपेट्या चे वाटप करण्यात आले असून सर्व मतदान केंद्रावर मतपेट्या पोहचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २१५ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . याशिवाय १७३ मतदान केंद्रावर १६ झोनल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया ५० हून अधिक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या १६ ओळखपत्रा पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवने आवश्यक असणारं आहे. मतमोजणी मंगळवार दि ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुवर्ण भुमी हौल मुस्कान लौन कोल्हापूर येथे १०० टेबलवर होणार असून त्या ठिकाणी ५५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here