पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून ,आजरा तालुक्यातील सुळे येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीचे निर्दयी कृत्य

0
137

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा.

                                                         आजरा :चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा घालून खून केला. आजरा तालुक्यातील सुळे गावात शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. सुमन संभाजी पोवार वय (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संभाजी ईश्वरा पोवार वय( ४८) यास आजरा पोलिसांनी अटक केली आहे.

पोवार दांपत्या आजरा कोळींद्रे रोडवर राहत होते. संभाजी पो वार याचा आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय होता. त्यातून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. शनिवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. यावेळी चिडलेल्या संभाजीने डोक्यात हातोडा घालून पत्नीचा खून केला आणि दरवाजा बंद करून तो पाठीमागच्या खोलीत जाऊन लपला होता. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आजरा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात दाखल केला याप्रकरणी पती संभाजी पोवार या प्रकरणी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here