प्रतिनिधी : मेघा पाटील
मुंबई स्वच्छ, सुंदर, प्रदुषणमुक्त करण्याच्या ध्यास घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडेसहाला सुरू केलेला स्वच्छतेचा जागर दुपारी बारापर्यंत सुरू होता. मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांनी डीप क्लिन मोहिमेचा शुभारंभ केला.
सायन, धारावी, कमला नेहरू पार्क, बाणगंगा, बीआयटी चाळ परीसर या भागांना भेटी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली स्वच्छतेची मॅरेथॉन जवळपास सहा तास सुरू होती. या भेटीत त्यांनी अंतर्गत रस्ते, गटारी, नाले सफाई, रस्त्यांची सफाई कामांची पाहणी केली.
मुंबईतील २४ वॉर्डमध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणार असून एकाच वेळी सुमारे तीन ते चार हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून रस्ते, गटारी, पदपथ, नालेसफाई या मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे.- मुख्यमंत्री @mieknathshinde
धारावी भागातील सार्वजनिक स्वच्छता गृह, शौचालये यांची दिवसातून पाच वेळा स्वच्छता करण्यात यावी. केवळ मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर न देता झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते, पदपथ यांची देखील साफसफाई करा.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईतील सफाई कामगारांच्या ४८ वसाहतींचा कायापालट करण्यात येणार असून गौतम नगर, कासरवाडी येथील सर्व वसाहतींमध्ये दर्जेदार सोयीसुविधा देण्यात येतील. स्वच्छतेच्या बाबतीत मुंबईचे नाव देशात नव्हे तर जगात अग्रक्रमावर येवू द्या,- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.