प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर:वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 7 नोव्हेंबर 2023.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर पुणे व सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारोळा (ता. भोर) येथील नीरा-नदीवरील पुलाच्या सातारा बाजूकडील शिंदेवाडी (जि. सातारा) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतुकीत बदल केला आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मंगळवार दि ६ डिसेंबर रात्री १२ वाजल्यापासून पासून हा बदल करण्यात आला आहे. शिंदेवाडी ( जि सातारा)येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत पर्यायी मार्गानेच वाहतूक सुरू राहील.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे खेड शिवापूर ते शेंद्रे (सातारा) येथील काम हे पीएस टोल रोड इन्फ्रा यांच्यामार्फत शिंदे डेव्हलपर्स ही कंपनी काम करणार आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घेऊन पोलिस दलास सहकार्य करावे, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.असा आहे वाहतूक मार्गातील बदल
सातारा बाजूकडून पुण्याला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक ही शिंदेवाडी फाटा येथून सेवारस्त्याने वळवली आहे.
भोरकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक शिंदेवाडी फाटा येथून सेवा रस्त्याने सारोळा पुलाखालून यू-टर्न घेऊन पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गाने वळवली आहे.
पुणे बाजूकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक शिंदेवाडी फाटा येथून सेवारस्त्याने वळवली आहे.
पुणे बाजूकडून भोरकडे जाणारी वाहतूक शिंदेवाडी फाटा पास करून पुढे पंढरपूर फाटा शिरवळ येथून यू-टर्न घेऊन शिंदेवाडी फाटा येथून भोरकडे जाईल.काम लवकर व्हावे
शिंदेवाडी येथे भोर व शिरवळ येथे झालेले शहरीकरण व औद्योगीकरणामुळे दाट लोकवस्ती असणारा हा भाग आहे. यामुळे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. हे काम अखंडित सुरू करून लवकरच हे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक यांनी केली आहे.