राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून ;१०० पेक्षा जास्त मोर्चे धडकणार

0
81

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

नागपूर : नागपूर येथे ७ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार हे हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या (शनिवार व रविवार) ४ दिवस असणार आहे. या अधिवेशन काळात विविध संघटनाची आंदोलने मोर्चे धडकणार असून जवळपास १०० पेक्षा जास्त मोर्चे नागपूर येथील विधानभवनावर धडकणार आहेत. यामध्ये ५० संघटनांच्या मोर्चा ना आतापर्यंत परवानगी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाच हिवाळी अधिवेशन गाजणार आहे .या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चेसाठी येणार आहेत‌. राज्यात होत असणाऱ्या मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येऊ शकतो. मराठा आरक्षणा सोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा विरोधक लावून धरु शकतात.राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, अशा विविध विषयांवर सभागृहांत मोठी खंडाजगी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here