Animal : रणबीरच्या ‘ॲनिमल’ने बॉक्स ऑफिसला पछाडलं! अवघ्या सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई

0
72

बहुचर्चित ‘ॲनिमल’ सिनेमा १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील डायलॉग, सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ॲनिमल’मधील रणबीरचा अवतार पाहून प्रेक्षकही भारावून गेले आहेत.

या सिनेमातील रणबीरच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिकडे तिकडे ‘ॲनिमल’चे शो हाऊसफूल होताना दिसत आहे.

‘ॲनिमल’ या बिग बजेट बॉलिवूड सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायला सुरुवात केली होती.

प्रदर्शनाआधीच ‘ॲनिमल’ सिनेमाने ‘ॲडव्हान्स बुकिंगमधून कोटी रुपये कमावले होते. टीझरपासूनच या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सिनेमांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली. प्रदर्शनानंतर सहा दिवसातंच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here