कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर -शिर्डी कोल्हापूर- तिरुपती, कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवा सुरु करण्याची खा संजय मंडलिक यांची विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कडे मागणी

0
96
कोल्हापूर हे आध्यात्मिक वा औद्योगिक शहर आहे. कोल्हापूर व नागपूर शहरा मध्‍ये मोठ्‍या प्रमाणात व्‍यापार चालतो. कोल्हापूर व नागपूर शहरा मध्‍ये नेहमी प्रवास करणारे व्‍यापारी आहेत. त्यामुळे कोल्हापूर - नागपूर विमानसेवा सुरु करावी. कोल्हापूर व शिर्डी ही दोन ही आध्यात्मिक शहरे असुन नेहमी भक्त ये जा करत असतात. त्यांची सोय होण्यासाठी कोल्हापूर - शिर्डी विमान सेवा सुरु करावी. या अगोदर चांगला प्रतिसाद असलेली कोल्हापूर - तिरुपती, कोल्हापूर - अहमदाबाद विमान सेवा बंद करण्यात आल्या आहेत त्या सेवा पुन्हा सुरु कराव्यात यासाठी खा संजय मंडलिक यांनी भेटून विनंती केली.                                   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here