सावित्रीबाई फुले रुग्णालय मुल्यांकनात उत्तीर्ण, राष्ट्रीय स्तरावरील मुल्याकनासाठी पात्र

0
97

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे राज्यस्तरावरील शासन समितीमार्फत मे २०२३ मध्ये करण्यात आलेल्या मुल्यांकनात रुग्णालयास ९३ टक्के गुण मिळाले असून त्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र महापालिकेस मिळाले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील मुल्यांकनासाठी हे रुग्णालय पात्र ठरले आहे.

भारत सरकारचा लक्ष हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांअंतर्गत प्रसुती कक्ष व मॅटर्निटी ऑपरेशन थिएटरच्या गुणवत्ता व इतर सुविधा पुरविण्यामध्ये सुधारणा करणे हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत हॉस्पीटलचे मुल्यांकन करण्यात येते. यामध्ये सावित्रीबाई फुले रुग्णालयास ९३ टक्के गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावरील मुल्यांकनासाठी पात्र झाले आहे.

या मुल्यांकनासाठी तत्कालीन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, तत्कालनी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. अमोलकुमार माने, डॉ. हर्षदा वेदक, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रशासन वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजुश्री रोहिदास तसेच सर्व वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी यांचे मोलाचे योगदानाने लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here