भेट शिवसेनेने भारावलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांची..

0
999

प्रतिनिधी: सौरभ पाटील

उंब्रज- कराड/ सातारा : शिवसेना नेते व सचिव खासदार श्री अनिल (भाऊ) देसाई यांचे सहकारी जेष्ठ शिवसैनिक कल्याणचे श्री मारुती माने यांची सदिच्छा भेट हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र उंब्रज ता कराड जिल्हा सातारा येथे सदिच्छा भेट दिली.

शिवसेना प्रवक्ते मा श्री अनिशजी गाढवे यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्रास भेट दिली यावेळी शिवसेना एक वादळ या यूट्यूब चैनल वरती एक व्हिडिओ क्लिप बनवली ती व्हिडिओ क्लिप ज्येष्ठ शिवसैनिक मारुती माने यांनी पाहिली आणि त्यांनी फोन करून १७ नोव्हेंबर २०२३ शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवतीर्थ (स्मृतीस्थळ) येथे भेट घेऊन कल्याणला त्यांच्या घरी नेऊन शिवसेना प्रमुख यांच्यावरील बनवलेला बाळ केशव ठाकरे बायोग्राफी ग्रंथ विविध वर्तमानपत्रातील शिवसेनाप्रमुखांची यांच्यावरील लेख , कात्रणे माहिती मिळवून अल्बम त्यांनी स्वतः तयार केलेला अभ्यास केंद्रात ठेवण्याकरता सुपूर्त केला व राहिलेली प्रबोधनकार शिवसेनाप्रमुख शिवसेना यांच्या विषयी असलेली ९१ पुस्तके १५१७२ रुपये किंमत असलेली पुस्तके त्यांनी उंब्रज येथील अभ्यास केंद्रात येथे येऊन सुपूर्द केली .

शिवसेना स्थापना,पूर्व काळ, मार्मिक पर्व, शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे युग प्रवर्तक शिवसेनेची घोडदौड अशा विविध कालखंडाची माहिती आलेख असलेला खजाना आपल्या संग्रहात अभ्यासकांना, पत्रकारांना, संशोधकांना, पाहिला व वाचायला उपलब्ध व्हावा यासाठी देत आहे. प्रिय महेशराव जय महाराष्ट्र
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र उंब्रज ता कराड जि.सातारा
आपल्या अभ्यास केंद्राला मी दिलेल्या विविध पुस्तके साप्ताहिके इ.माहितीपुर्ण कात्रणे देताना मला मनस्वी आनंद समाधान वाटत आहे .
आपणं हाती घेतलेले शिवकार्य अत्यंत स्पृहणीय आहे युगांतक आहे.आपल्या संग्रहात मी खारीचा वाटा उचलला आहे‌.

मारुती माने यांनी दिलेली पुस्तके

ऊठ मराठ्यां ऊठ, माझी जीवनगाथा, बाळ केशव ठाकरे फोटोबायॉग्रफी ,शिवसेना समज गैरसमज, ठाकरे एक धगधगता विचार, वाघाचे पंजे, एक वचनी भाग १/२ ,युगप्रवर्तक, शिवसेना काल आज उद्या, शिवसेनेची निर्मिती, बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय, साहेब गजाआडील दिवस, कवचकुंडले, हिंदुहृदयसम्राट ,साहेब एकच वाघ, हिंदुत्व सार आणि धार, विचाराच सोन,युगपुरुष बाळासाहेब ठाकरे, माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरे आदरांजली विशेषांक, प्रबोधन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, बाळासाहेब, शिवसेना लोकाधिकार आणि मी, बाळासाहेब ठाकरे, दिलसे, प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व, कर्तृत्वाचा महामेरू बाळासाहेब ठाकरे,प्रबोधनकार ते मार्मिक कार, जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास, आपले बाळासाहेब, धर्मवीर आनंद दिघे, ठाण्यातील भक्त प्रल्हाद, जागर शिवशाहीचा, महामृत्युंजय हिंदुहृदयसम्राट, वकृत्व- प्रबोधनकार ठाकरे, गाडगेबाबा- प्रबोधनकार ठाकरे, सामना, मार्मिक, दिवाळी अंक इतर विविध साप्ताहिक आहे
मार्मिक सामना वर्तमान पत्र तसेच शिवसेना व वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी विविध लेखकांनी लिहिलेले पुस्तके साप्ताहिके विविध मराठी वर्तमानपत्रात आलेले लेख व त्या विषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया
अशी विविध माहिती संकलित करून अभ्यास केंद्राला सुपुर्द केला आहे

यावेळी शिवसेना उपनेत्या सौ छायाताई शिंदे यांनी शाल श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार केला . मा श्री बाळासाहेब शिंदे, अक्षय जाधव, दिपक वेल्हाळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here