शाहूवाडी तालुक्यातील सावे येथे बिबट्यांच्या हल्ल्यात ११ बकरी ठार

0
396

. प्रतिनिधी : अमर पाटील

शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील माळरानावर बसलेल्या मेंढरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ११ मेंढ्या ठार झालेल्या असून यातील एका मेंढीला अर्धवट खाल्ले असून इतर सर्व मेंढीच्या मानेचा घोट घेतला आहे. सावे येथील गोगवे गांवच्या दिशेला असणाऱ्या माळरानावर ईश्वरा वग्रे यांची मेंढर बसली होती. दि १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ११ मेंढ्या ठार झाल्याची घटना घडली आहे .दरम्यान घटनास्थळी वनरक्षक आशिष पाटील,शंकर लवटे, या वन कर्मचाऱ्यानी भेट देत पंचनामा केला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान शित्तूर वारुण परिसरासह शिंपे वडगांव परिसरातून बिबट्याने सावे परिसरात आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येते आहे. याबाबतची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी व परिसरातील नागरिकांना यासंबंधी माहिती देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here