कोल्हापूर येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून विशाल लोंढे यांची पदोत्रतीने बदली झाली…

0
246
This image has an empty alt attribute; its file name is 2fec10bc-4168-463a-9bb9-e5209c7eb780.jpeg

मा. शासनाच्या आदेशानुसार आज दि.
११ ऑगस्ट २०२३ रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या पदावरून कार्यमुक्त होऊन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे या पदाचे कामकाज हाती घेण्यासाठी निघत आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या पदावर मागील २ वर्षे ८ महिने कार्यरत होतो. सदर कालावधीमध्ये सर्वच विभाग प्रमुख आणि सहकाऱ्यांचे, सर्व राजकीय, सामाजिक संघटनांचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आणि त्यायोग्य जनतेचे कमालीचे सहकार्य लाभले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे समाज कल्याण विभागाअंतर्गत असलेल्या विविध योजना, तळागाळातील वंचित, बहुजन जनतेपर्यंत उत्तम पद्धतीने पोहोचविता आल्या. नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कामकाज पार पाडता आले. समाजातील वंचितांना, विविध घटकांना जास्तीत जास्त न्याय देता आला. माझ्या बदली निमित्त आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेट घेऊन, फोन करून तसेच समाज माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर माझ्यावर आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here