राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान असून त्या देवस्थानला भक्ताकडून धान्य येत असतं ते वाटप करताना बाळूमामा देवस्थानचे कर्मचारी दादागिरी करत असतात ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे
भुदरगड तालुक्यामध्ये येत असलेल्या आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्र कर्नाटक कोकण या राज्यातील भक्तांचे बाळूमामा देवस्थान असून ते देवस्थान चांगले असल्याने बाळूमामा देवस्थान ला भक्ताकडून धान्यरूपात दान दिले जाते परंतु ते धान्य भक्तांना पाहिजे तसे दर लावून विक्री केली जात असते
मागील दर
तांदुळ 17₹
गहु 15₹
साखर 22₹
बाजरी 15₹
ज्वारी 17₹
गुळ 15₹
चालु नवीन दर
तांदुळ 26₹
गहु 25₹
साखर 32₹
बाजरी 18₹
ज्वारी 25₹
गुळ 30₹
परंतु भक्त बाळूमामाचे धान्य मिळते म्हणून बाळूमामाच्या देवाला मध्ये पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लावत असतात परंतु बाळुमामाची कर्मचारी धान्य वाटप करण्यासाठी आहेत ते गरीब भक्तांना दादागिरी करून त्यांच्याकडून नामात्र किंमत न घेता जादा दराने विक्री केली जाते
यासंबंधी कोल्हापूर देवासन कमिटीने याकडे तातडीने लक्ष घालून बाळूमामा भक्तांना न्याय द्यावा व बाळूमामा देवस्थानला दिलेले भक्ताकडून धान्य इतर कुठे जाते याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील सौरभ पवार अनिल पाटील संदीप लोंढे प्रमोद कांबळे श्रीधर गुरव विमल पाटील शेवंता कांबळे यांनी करण्यात येणार असल्याची माहिती अशोक पाटील दिली