कागल तालुक्यातील सोनाळीत दोन कुटुंबांतील मारामारीत तिघेजण गंभीर जखमी; चौघांच्यावर गुन्हा दाखल

0
180

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

कागल : सोनाळी (ता कागल) येथे दोन कुटुंबांतील किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले असून या मारामारीत लोखंडी रॉड, काठ्या, फरशीच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. या दरम्यान मुरगुड पोलिस ठाण्यात चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सौ वासंती राजेंद्र चौगले राहणार सोनाळी (ता कागल ) यांनी दिली आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की फिर्यादी वासंती राजेंद्र चौगले ह्या आपल्या घरा शेजारी लागून असलेल्या जागेवर बांधकाम सुरू असल्याने तेथे असणाऱ्या बांधकाम कामगारांना चहा पाणी घेऊन गेल्या होत्या त्याचवेळी, दिपक दत्तात्रय चौगले, अमित आनंदा चौगले, आनंदा बापुसौ चौगले, अलका दत्तात्रय चौगले, यांनी यावेळी त्यांना शिवीगाळ केली तसेच राहूल याला आनंदा चौगले यांनी लोखंडी रॉड ने माराहण केली त्यामुळे राहुल हा खाली बसला. त्यानंतर दिपक चौगले आणि अमित चौगले यांनी राहूलच्या पाठीत काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले सर्वांनी फिर्यादी सौ वासंती राजेंद्र चौगले यांच्या घरात घूसून पती राजेंद्र चौगले यांना लोखंडी रॉड व काठ्यानी आमित चौगले आणि दिपक चौगले यांनी माराहण करुन गंभीर जखमी केले आहे. या माराहणीत एकाच कुटुंबातील राहूल राजेंद्र चौगले, राजेंद्र बापुसौ चौगले, शेखर राजेंद्र चौगले हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या माराहणीतील दिपक चौगले, अमित चौगले, आनंदा चौगले, अलका चौगले, सर्व राहणार सोनाळी (ता कागल) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. असून मुरगुड पोलिस ठाण्याचे पोलिस कौन्सटेबल पार्ले हे याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here