परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा गगनगिरी येथे शिवशक्ती महायज्ञाचे भूमिपूजन संपन्न..

0
68

प्रतिनिधी: प्राध्यापक मेघा पाटील
गगनबावडा येथे गगनगिरी गडावर शुक्रवार दिनांक 15 /12 /2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 01 रोजी या वेळेत जनकल्याणासाठी 51 कुंड शिवशक्ती यज्ञ भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.या महायज्ञ सोहळ्याच्या भूमिपूजनासाठी सर्व भक्तजनांनी उपस्थिती दर्शवली होती.

येत्या 9 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत होणाऱ्या शिवशक्ती यज्ञाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व भाविकांनी यज्ञाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजक डॉ. संगीता पाटील व व्यवस्थापक मंगेश लाड यांनी केले आहे.

या भूमी समारंभ वेळी गगनबावडा ग्रामपंचायत सरपंच सौ मानसी गुरुनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ दिलीप कांबळे, या शिवशक्ती महा यज्ञाचे आयोजक डॉ. संगीता पाटील, व्यवस्थापक मंगेश लाड, गगनबावडा ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि भक्तजन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here