आजचे राशिभविष्य, 16 डिसेंबर 2023: या राशीचा आर्थिक लाभ आणि नावलौकिक वाढणार, पाहा तुमचे भविष्य

0
63

Today’s Daily Horoscope 16 December 2023: आज शनिवार, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी, चंद्रचे मकर राशीत संक्रमण आहे.भविष्यात काय होणार हे जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सूक असतं.म्हणून तर राशीभविष्य तुम्हाला सजग बनवतं. आजच्या दिवशी तुमच्या राशीत काय लिहीलं आहे. गाडी घेवू का? घर होणार का? नोकरी मिळणार का? नवीन प्रोजेक्ट येणार?व्यवसायात नफा होणार?मुलांच्या भविष्याची चिंता असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतील तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

मेष राशीला मोठा निर्णय घ्यावा लागणार

आज तुम्हाला भविष्याशी संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल.तुम्हाला तुमच्या मुलांना बाहेर शिकवायला पाठवायचे असेल तर सध्या वेळ चांगली सुरु आहे.आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या तब्येतीसंदर्भात काही तक्रारी असतील तर त्या कदाचीत वाढतील म्हणून वेळेवर वैद्यकिय सल्ला घ्यावा. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागू शकते.
आज नशीब ९१ % तुमच्या बाजूने असेल. गरिबांना कपडे आणि अन्नदान करा.

वृषभ राशीने खर्चावर नियंत्रण ठेवावे

वृषभ राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला असून तुम्हाला आनंद देणारी बातमी कळणार आहे. आज तुम्ही गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च केले तर पुढे तुम्हालाच त्याचा त्रास होवू शकतो.वाढत्या खर्चाबद्दल थोडे चिंताग्रस्त असाल, म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल, ज्यामुळे संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसाठी पार्टीआयोजित करू शकता. जर तुम्ही आज कोणाशी पैशांचा व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर ते खूप काळजीपूर्वक करा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होवू शकते.
आज ७९ % नशीब तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या मंदिरात हरभरा डाळ आणि गूळ पिवळ्या वस्त्रात गुंडाळून अर्पण करा.

मिथुन राशीने व्यवसायात गुंतवणूक करताना सावधान

आजचा दिवस तुमच्या व्यवसायात काही समस्या घेऊन येईल, त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधीची माहिती नीट समजून घ्यावी लागेल, मग गुंतवणूक करा अन्यथा तुम्हाला पैसे गमवावे लागू शकतात. आज जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही काळजीत असाल. संध्याकाळी परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुमची फसवणूक होऊ शकते.
आज नशीब ८२% तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालीसा पठण करा

कर्क राशीची महत्त्वाची कामे पूर्ण होणार

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणारा आहे. विवाहयोग्य व्यक्तींसाठी आज चांगली स्थळ येणार आहेत. जे वैवाहिक जीवनात आहेत त्यांचे जीवन सुखी असून जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन कराल पण अचानक गाडी बिघाडामुळे तुमचा खर्च जरा जास्तच वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. संध्याकाळी तुम्ही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात वेळ व्यतीत कराल.
आज नशीब ६८% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाचे लाडू अर्पण करा.

सिंह राशीने तब्येतीकडे लक्ष द्यावे

आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी कठीण असेल. जर तुम्हाला आधीपासूनच एखादा आजार असेल तर तो आज वाढू शकतो. असे झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी वेळ चांगली आहे. आज कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात कर्ज घेऊ नका, कारण ते फेडणे तुमच्यासाठी अवघड होईल. आजची संध्याकाळ आई-वडिलांच्या सेवेत व्यतीत कराल.
आज ७९ % नशीब तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.

कन्या राशीसाठी शुभदायक दिवस

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार असून कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. घरात शुभ आणि मंगलकार्या संदर्भात चर्चा होईल. विद्यार्थ्यांना आज काही अवघड विषयांचा अभ्यास करण्यात अडचण येईल, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज असेल परंतु आज तुमचे काही शत्रूदेखील सक्रिय असतील, ज्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल, अन्यथा ते तुमचे नुकसान करू शकतात.
आज नशीब ८६% तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा तिलक लावा आणि तांब्याच्या भांड्याने शिवपींडीवर जल अर्पण करा.

तुला राशीसाठी कौटुंबिक ऐक्य वाढेल

तुमचा दिवस तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत व्यतीत कराल, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक ऐक्य वाढेल, परंतु जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची समस्या असेल तर आज ती समस्या वाढू शकते, ज्यामुळे तुमच्यावर ताण तणाव जाणवेल. असे झाल्यास कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालण्याची गरज नाही. जर तुम्ही असे केले तर ते तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतो. आज संध्याकाळी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
आज नशीब ८३ % तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा.

वृश्चिक राशीला जुने मित्र भेटतील

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. आज जुने मित्र भेटतील आणि त्यांच्यासोबत मस्त वेळ घालवणार आहात, ज्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आज तुमच्या भावंडांशी भविष्यातील काही योजनांवर चर्चा करू शकता. आज संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टींची खरेदी करताना पैसे कमी पडू शकतात. इच्छित नफा मिळाल्यामुळे छोटे व्यापारी आज आनंदी राहतील.
आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. रोज रात्री काळ्या श्वानाला शेवटची भाकरी किंवा पोळी खायला द्या.

धनु राशीने वाणीवर नियंत्रण ठेवावे.

तुम्हाला आज वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. जर तुम्ही काही बोललात तर ते ऐकल्यानंतर तुमचा एखादा मित्र तुमच्यावर रागावू शकतो, त्यामुळे आज जर तुमची कोणाबरोबर काही खास बोलणी होणार असतील तर तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून काही रक्कम मिळेल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता, परंतु तुमची मिळकत किती आहे हे लक्षात घेवूनच खरेदी करावी.
आज नशीब ९५ % तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करावे.

मकर राशीसाठी मानसिक शांतता देणारा दिवस

आजचा दिवस तुमच्यासाठी मानसिक शांतीचा असेल थोडावेळ तुम्ही एकट्याने वेळ व्यतीत कराल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज तुमच्या सभोवतालचे वातावरणही आनंदी राहील, कारण आज मुलांकडून काही सकारात्मक बातमी ऐकायला मिळू शकते. लव्हलाईफमध्ये असणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे तुमचे नाते अधिकच वृद्धींगत होईल.आज घराच्या रंगरंगोटीसाठी ही काही पैसे खर्च करू शकता. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत पिकनिकला जाण्याचा बेत आखू शकता.
आज नशीब ९१ % तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा तिलक लावा.

कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम दिवस

आजचा दिवस तुमच्यासाठी ठिक ठिक असून परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आजचा दिवस उत्तम आहे. तुमची स्वप्ने सत्यात उतरणार आहात.सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या लोकांना शत्रूंपासून सावध राहावे लागेल कारण वरिष्ठांकडे तुमची चुगली करु शकतात. त्यामुळे तुमची पदोन्नती आणि वेतनवाढ थांबवू शकते म्हणून सावध राहा. आजची संध्याकाळ आई-वडिलांच्या सेवेत व्यतीत कराल. एखाद्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी आणि वैयक्तीक तक्रारी दूर करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे.
आज नशीब ७६ % तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणाला दान करा.

मीन राशीला ऑफसमध्ये चांगली बातमी समजेल

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल जर तुम्ही कुणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात. व्यावसायिकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरदार लोकांच्या सूचनांचे आज कामाच्या ठिकाणी स्वागत होईल, जे पाहून तुम्हाला आनंद होईल. आज एखादे आवडीचे काम तुम्हाला देण्यात येईल त्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा वेळ छान जाणार आहे. मुलाशी भविष्यातील योजनांबद्दल बोलण्यात संध्याकाळ व्यतीत कराल. आज जोडीदारासोबत थोडं भांडण होवू शकते
आज नशीब ९७ % तुमच्या बाजूने असेल. माता पार्वतीची पूजा करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here