कोल्हापूर : पाटगाव (ता भुदरगड )मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत उभारण्यात येणारा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प इतर ठिकाणी उभा करा अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे आमदार प्रकाश आबीटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली.
भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्पाचे पाणी भुदरगड तालुक्याकरीत जीवनदायी आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यातील सुमारे १२०७० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. एकुण १०५.२४२ दलघमी चे असणाऱ्या या धरणामधील ७७ दलघमी एवढ्या पाण्याचा वापर केवळ सिंचनाकरिता होतो. बिगरसिंचनाकरिता ५.७३ दलघमी एवढा पाणी वापर होतो. उर्वरित पाणी नदी खोऱ्यातील भविष्यकालीन योजनांसाठी आवश्यक आहे. तसेच पाटगाव प्रकल्पामध्ये मुळ नदी स्त्रोतातुन येणारे पाणी हे कमी असल्याने पाटगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणेकरिता खुप कालावधी लागतो. पाटगांव प्रकल्पावर भुदरगड तालुक्यातील नागरीकांच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्यावर अवलंबून असून सदर प्रकल्प इतर ठिकाणी उभा करा अशी मागणी केली.