देशाच्या विकासात चार्टर्ड अकाउंटंटचे महत्त्वाचे योगदान – सी. ए. महेश पोतदार
इचलकरंजी – चार्टर्ड अकाउंटंट होण्याचे दिशेने प्रवास सुरू करण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांना नवऊर्जा व पाठबळ मिळण्यासाठी श्रद्धा जुनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये सीए फाउंडेशन परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी येथील वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे व नामांकित चार्टर्ड अकाउंटंट श्री महेश पोतदार व त्यांच्या सौभाग्यवती आशा पोतदार उपस्थित होत्या.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आय सी ए आय) जून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत उज्वल व नेत्र दीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभावेळी बोलत होते. यावेळी सीए महेश पोतदारांनी विद्यार्थ्यांची मनमोकळ्या गप्पा मारल्या. सीए फाउंडेशन ची तयारी कशी करावी, तयारी करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या, त्या कशा सोडवाव्यात, अभ्यासाचे नियोजन कसे करावे असे अनेक बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
श्रद्धा इन्स्टिट्यूट ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी असते अनेक विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्याचे कार्य या संस्थेने केले आहे या इन्स्टिट्यूटची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. भविष्यात या क्षेत्राकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल राहावा यासाठी श्री. ए. आर. तांबे इचलकरंजी येथे अकाउंटन्सी म्युझियम बनवावे अशा भावना यावी बोलून दाखवल्या. सदर भावनेला प्रतिसाद देत संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे काही दिवसातच अकाउंटन्सी म्युझियम उभी असेल आणि त्याची कारवाई आतापासून सुरू होईल अशी ग्वाही महेश पोतदार यांना दिली.
श्रद्धा जुनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सचे तब्बल 27 विद्यार्थी सीए फाउंडेशन परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत इंटरमीडिएट साठी पात्र ठरले आहेत. ही खूप मोठी बाब आहे असे प्रतिपादन सी ए महेश पोतदार यांनी केले. चार्टर्ड अकाउंटंट बनण्याची प्रक्रिया लांबलचक आहे आणि परिणामी विद्यार्थ्यांचे लक्ष यामुळे विचलित होऊ शकते, परंतु सातत्य,मेहनत, जिद्द, चिकाटी या गोष्टी विद्यार्थ्यांकडे असतील तर त्याला शंभर टक्के यश मिळेल .
उत्तुंग यश संपादन करणारे विद्यार्थी अनुक्रमे – भूमिका मुदंडा (322), सन्मती पाटील (316), प्रांजल अग्रवाल (315), हर्षल लढा (296), नयन राठी (287), देवांशी बालदी (285), आदिती कबाडे (268), तनिषा जैन (261), प्रज्ञा राघू (253), अस्मिता कौलवकर (245), अमेय कदम (244), कृतिका पाटील (242), सिद्धी बालदी (239), राजेश्वरी मगदूम (237), भूमिका भन्साळी (236), सिद्धी कुलकर्णी (236), कनक दाहिमा (231), सृष्टी नाईकनवरे (223), दिया पाटील (222), राकेश चौधरी (222), अंजली तनवाणी (210), आदित्य (210), मनीष संकाण्णा (209), ओमकार भोईटे (208), धीरज कुलकर्णी (207), हर्षदा बडे (206). या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे, संस्थेचे समन्वयक श्री. एम. एस. पाटील, सौ. सुप्रिया कोंदाडे, सौ. संगीता पवार, श्री. अक्षय, श्री. अभिषेक, सौ. सृष्टी, कॉमर्स विभागाच्या समन्वयिका सौ.कानिटकर या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.