Sp9/कोकरूड प्रतिनिधी
समाज नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करत असतो असे प्रतिपादन शिवतेज उद्योग समूहाचे संस्थापक अनिलराव देशमुख यांनी केले ते कोकरूड फाटा येथील क्रिकेट मैदानावर आयोजित अमीर मुलानी व संजय घोडे यांच्या सत्कार निमित्त बोलत होते. यावेळी माऊली हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर प्रशांत ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अनिलराव देशमुख म्हणाले की कोकरूड गावाला कबड्डी तसेच क्रिकेट खेळाची परंपरा आहे परंतु क्रिकेट खेळासाठी चांगले व पुरेसे मैदान उपलब्ध नव्हते. कोकरूड फाट्यावरील असणारे मैदान आहे .परंतु तेथे खाचखळगे होते. हे मैदान दुरुस्ती साठी कोकरूड येथील क्रिकेट प्रेमी अमीर मुलांनी व संजय घोडे यांनी स्व:ता पुढाकार घेऊन ग्रामपंचायत व काही ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून चांगले मैदान केले आहे. यामुळे क्रिकेट खेळाडूंना पुन्हा एकदा चांगली संधी उपलब्ध झाली आहे. डॉ.प्रशांत ठोंबरे म्हणाले की, कोकरूड व परिसरातील खेळाडूंना खेळण्यासाठी चांगल्या मैदानाची आवश्यकता होती. यासाठी क्रिकेट प्रेमी अमीर मुलाणी व संजय घोडे यांनी विशेष प्रयत्न करून हे चांगले मैदान केले. येथे लवकरच हिरा चषक स्पर्धा होणार आहेत. याबद्दल क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी क्रिकेटप्रेमी
अमीर मुलाणी व संजय घोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिवतेज उद्योग समूहाचे संस्थापक अनिलराव देशमुख , माऊली हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.प्रशांत ठोंबरे खेळाडू विष्णू सर्यवंशी, राहुल नांगरे, समीर मुल्ला, रवी कापरे आदींसह निनाई स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू उपस्थित होते.