तारदाळ : वार्ताहर-
साहित्यप्रेमी युवा मंच व तारदाळ परिसर पत्रकार संघटनेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे ग्रामरत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. याही वर्षी ग्रामरत्न पुरस्कार जाहिर झाले असून मरणोत्तर शौर्य पुरस्कार शहीद निलेश खोत, आदर्श संस्थाचालिका पुरस्कार सौ. सपना आवाडे, प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य पो. नि. विकास भुजबळ, शशिकांत डोणे, सहकाररत्न अशोक पाटील, आदर्श उद्योग समुह आयबेनस्टॉक पॉझीट्रॉन इलेक्ट्रोवर्क तारदाळ, एस. के. पॅकींग, आदर्श सरपंच सौ. पल्लवी पोवार, पत्रकार गौरव पुरस्कार बाबा लोंढे उद्योगभूषण सुभाष खोत, प्रविण पाटील, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य अमितकुमार खोत, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य अमोल भागवत (पुणे), आदर्श शिक्षक एस.बी.मसुटे, चंद्रशेखर समाजे, सुनिल काळे, सौ. आशा गडदे, दुग्ध व्यवसायातील उल्लेखनीय कार्य विकास भगत, स्थापत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य अजित पाटील, कृषीभूषण राजेंद्र बन्ने आदींना जाहीर झाला असून सदर पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा रविवार दि. १४ जानेवारी रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती साहित्यप्रेमी युवा मंचचे गजानन खोत, दिलीप खोत व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली.