कोल्हापूर शहरात गुरुवारी एक रुग्ण कोविड १९ पॉझिटिव्ह आला आहे.

0
102

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गुरुवारी एक रुग्ण कोविड १९ पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाची स्थिती धोकादायक नसली तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून वैयक्तिक काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केले आहे.

नागरिकांना स्वतःला, आणि कुटुंबाला या आजारापासून दूर ठेवायचे असेल तर वैयक्तिक तसेच सामाजिक खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी मास्क वापर करावा, शक्यतो गर्दी करू नये अथवा गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here