रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे सर्व प्रकारच्या यजुर्ससाठी स्वस्त आणि महाग असे रिचार्ज प्लॅन आहेत. जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनला अनेक कॅटगरीमध्ये विभागले आहे.
मोबाइल युजर्स आपल्या बजेटनुसार प्लॅन निवडू शकतात. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओने आता आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार New Year 2024 Gift आणले आहे.
रिलायन्स जिओकडे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन्ही प्लॅन्स आहेत. लाँग प्लॅन एखाद्या वेळी थोडा महाग वाटू शकतो, परंतु त्यांचे बरेच फायदे आहेत. जिओ आता आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट म्हणून 24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देत आहे. व्हॅलिडिटीसोबतच कंपनी ग्राहकांना एक्स्ट्रा 75GB डेटा देखील देत आहे.
389 दिवसांची मिळेल व्हॅलिडिटी
ज्या जिओ प्लॅनबद्दल आम्ही सांगत आहोत तो वार्षिक प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे. तुम्हाला हा प्लॅन एकावेळी महाग वाटू शकतो, पण त्याची रोजची किंमत 8 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडिटी देते, परंतु नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये 24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळते. अशा प्रकारे तुम्ही 389 दिवस नेहमी रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता.
कंपनी देतेय 900GB पेक्षा जास्त डेटा
जिओच्या या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 912.5GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्ही दररोज 2.5GB डेटा वापरू शकता. ज्यांना अधिक डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्लॅनद्वारे डेटाशी संबंधित महत्त्वाची कामे सहजपणे करू शकता.
तुम्ही तुमचा Reliance Jio नंबर किंवा प्लॅन रिचार्ज केल्यास तुम्हाला इतर अनेक फायदे देखील मिळतात. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 389 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकता. याचबरोबर, या प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 100 एसएमएसचा लाभ घेऊ शकता. तसेच, जिओकडून या प्लॅनमध्ये आपल्या युजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर फ्री अॅक्सेस सुद्धा दिला जातो.