कोल्हापूरच्या उत्कृष्ट चव्हाण याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले

0
140

मलेशिया (कोलालंपुर) येथे दिनांक 10 ते 18 डिसेंबर 2023 आखिर झालेल्या एशियन क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 83 किलो वजनी गटात उत्कृष्ट उत्तम चव्हाण याने रौप्य पदक मिळवले.

त्याने डेड लिफ्ट या प्रकारात सुवर्णपदक तसेच स्कॉट व बेंच प्रेस मध्ये रोपे पदक संपादित करीत एकूण स्पर्धेत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.


याआधीही त्याने काशीपूर, उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. अपंगत्वावर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

दररोज त्याच्या नियमित सराव सुरू असून त्याला गुरुवर्य बिभीषण पाटील सर, महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई, त्याचे वडील उत्तम चव्हाण, प्रा. डॉ. प्रशांत पाटील, प्रशिक्षिका सारिका सरनाईक व शुक्ला बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here