झी मराठीवर लवकरच दाखल होणार दोन नवीन मालिका, ‘पारू’ आणि ‘शिवा’ भेटीला

0
75

सध्या झी मराठी वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी दोन नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

हे प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेचं नाव आहे ‘पारू’ आणि ‘शिवा’.

झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक नवीन प्रोमो सगळ्यांनी पाहिलाच असेल. झी मराठी लवकरच घेऊन येत आहे आपल्या प्रेक्षकांसाठी दोन सुंदर मालिका ‘पारू’ आणि ‘शिवा’. दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी , आपुलकीने वागणारी, मनसोक्त हसणारी, नितळ पारू जणू झरझरणारा अवखळ झरा. अश्या नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे ‘शरयू सोनावणे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here