सलग दुसऱ्या दिवशी Paytm आपटला, २० टक्क्यांची घसरण; २ दिवसांत गुंतवणूकदारांचे १७.४ कोटी बुडाले

0
75

Paytm Share Price: फिनटेक कंपनी पेटीएमचे शेअर्स (Paytm) आज सलग दुसऱ्या दिवशी जोरदार आपटले. यानंतर या शेअरला लोअर सर्किट लागलं. लोअर सर्किट म्हणजे या शेअर्सच्या खरेदीसाठी कोणतेही खरेदीदार नाहीत.

रिझर्व्ह बँकेनं केलेल्या कारवाईमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

दोन दिवसांपूर्वी आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवसायावर अनेक मोठे निर्बंध लादले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला कंपनीच्या शेअर्सला लोअर सर्किट लागलं आणि त्यानंतर कंपनीचे शेअर्स आज पुन्हा लोअर सर्किटवर पोहोचले. आता बीएसईवर त्याच्या शेअर्सची किंमत ४८७.०५ रुपये आहे. दोन दिवसांत पेटीएमचे शेअर्स सुमारे २७४ रुपयांनी घसरले असून गुंतवणूकदारांचे सुमारे १७.४ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

विजय शेखर शर्मा काय म्हणाले?

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर कंपनीचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक माहिती शेअर केली आहे. “प्रत्येक पेटीएमरसाठी… तुमचं प्रिय अॅप काम करतआहे. हे २९ फेब्रुवारीनंतरही काम करत राहील. प्रत्येक समस्येवर तोडगा काढता येतो. आम्ही देशाला पूर्ण क्षमतेनं सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असं ते म्हणाले.

रिझर्व्ह बँकेकडून कारवाई

नियमांचं पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. दरम्यान, फिनटेक कंपनी पेटीएमवर आरबीआयनं लादलेल्या बंदीला सामोरं जावं लागत आहे. नियमांचं उल्लंघन आणि अनुपालनाशी संबंधित समस्यांमुळे, RBI नं पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारी २०२४ पासून विविध प्रकारच्या सेवा देण्यावर बंदी घातली आहे.

(टीप – यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here