‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर रेश्मा शिंदे दिसणार नव्या मालिकेत; भूमिकेबाबत दिली माहिती

0
45

 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर रेश्मा आता लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

रेश्मा शिंदेचे ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी नावाचे पात्र असणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, “‘रंग माझा वेगळा’ मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. ही मालिका माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here