भाजप आमदाराने केलेलं गोळीबार प्रकरण ताजं असताना आज ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार उपचारादरम्यान मृत्यू

0
111

मुंबई :शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील दहिसर येथे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला असून त्यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांना दहिसर करुणा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पैशाच्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here