एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी

0
114

मुंबई : मुंबई अंडरवर्ल्डमधील शेकडो गुन्हेगारांचा खात्मा करून देशभर प्रसिद्धीच्या झोतात आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं वृत्त आहे. मुंबईतील अंधेरी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये आयकर विभागाची कारवाई सुरू असल्याचं कळतंयअँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here