उन्हापासून कोल्हापूरकरांना थोडा दिलासा मिळणार, तीन दिवस मध्यम थंडीची शक्यता

0
69

कोल्हापूर : राज्यातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असताना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची, तसेच चढ-उतारासहित अल्पशी का होईना, पण शेतपिके व फळबागांना लाभदायक ठरू पाहणारी हिवाळ्यातील थंडी फेब्रुवारी अखेरपर्यंतची आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करणार अशी शक्यता आहे.

दि.२१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या तीन दिवसांत पुन्हा मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे.

उत्तर भारतात एकापाठोपाठ, कमी दिवसांच्या अंतराने, मार्गक्रमण करणाऱ्या, तीव्र पश्चिम झंजावातांची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे, हे घडत आहे. उत्तर भारतात धुक्याचे प्रमाणही आता कमी होऊन दृश्यमानताही तेथे सुधारली आहे. संपूर्ण उत्तर भारतात रविवारपासून पुढील ५ दिवस म्हणजे, २२ फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी झंजावात आणि त्याचबरोबर मध्य-भारत स्थित ‘ प्रत्यावर्ती वारा पॅटर्न’च्या बदलातून तेथे पुन्हा जोरदार पाऊस, जबरदस्त बर्फवृष्टी आणि गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच संपूर्ण उत्तर भारत ते महाराष्ट्रातील खानदेशातील अक्षवृत्तपर्यंत, समुद्रसपाटीपासून साडेबारा किमी उंचीवर, पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २७० किमी अतिवेगवान प्रवाही झोताचे ‘पश्चिमी’ वाऱ्यांचे वहन अजूनही टिकून आहे.

कर्नाटक किनारपट्टी ते खान्देशपर्यंत समुद्रसपाटीपासून साधारण १ किमी उंचीपर्यंत पसरलेला हवेच्या कमी दाबाचा असा ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा खडीत स्रोत टिकून आहे. यामुळे महाराष्ट्रात मुंबईसह कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या १७ जिल्ह्यांत उत्तरेकडून घुसणाऱ्या थंड वाऱ्यांच्या शक्यतेमुळे, पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन, दि. २१ ते २३ फेब्रुवारी (बुधवार ते शुक्रवार) पर्यंतच्या तीन दिवसात पुन्हा मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here