
सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. लक्ष्मीकांत बेर्डेंची पुढची पिढी सुद्धा म्हणजेच त्यांची मुलं अभिनय, स्वानंदी (Swanandi Berde) सुद्धा मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.
अभिनय आता लोकप्रिय अभिनेता झालाय हे सर्वांना माहितच आहे. अशातच लक्ष्मीकांत यांची लेक स्वानंदी सुद्धा आता सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. ‘मन येड्यागत झालं’ या सिनेमातून स्वानंदी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय.
याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर स्वानंदीच्या जोडीला या चित्रपटात संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्ण यांचे रुप साकारत दर्शन देणारा अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता स्वानंदी व सुमेध यांची फ्रेश जोडी ‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. तर अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
