Whatsapp स्टेटसमध्ये होणार बदल? कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

0
78

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सच्या सोयीसाठी वेळोवेळी अनेक नवीन फीचर्स सादर करत आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आपल्या ‘चॅनेल’ या फीचरचा विस्तार करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करत आहे.

मात्र, अलीकडील घडामोडींवरून असं निदर्शनास येतं की, मेटाच्या मालकीचं असलेलं हे चॅटिंग ॲप इतर विभागांकडे देखील लक्ष देत आहे.

नवीन व्हॉट्सअ‍ॅप फीचर्सचा स्रोत असलेल्या WABetaInfoच्या मते, मेसेजिंग प्लॅटफॉर्म सध्या आपल्या स्टेटस अपडेट्स टॅबचं युजर इंटरफेस सुधारण्यावर काम करत आहे. गुगल प्ले बीटा प्रोग्रॅममध्ये असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन 2.24.4.23 मध्ये हे बदल दिसले आहेत.

स्टेटस अपडेट्स अधिक सुलभ करण्यासाठी हे नवीन अपडेट तयार केलं जात असल्याची चर्चा आहे. सध्या अपडेट्स टॅबच्या वरच्या बाजूला असलेल्या ‘स्टेटस अपडेट’मध्ये एक बदल होईल. ज्यामुळे युजर्सना थंबनेल्सच्या माध्यमातून शेअर केलेल्या अपडेटचे रिव्हू घेता येतील. जेणेकरून त्यातील कंटेट बघण्यासाठी युजर्सना ते ओपन करावे लागणार नाही. नवीन डिझाईनमधील युजर इंटरफेस हा कार्डच्या आकाराचा आहे. फेसबुक मोबाईल ॲपमध्ये देखील असाच इंटरफेस आहे.

पूर्णपणे अंमलात आणल्यानंतर हे अपडेट केलेलं स्टेटस डिस्प्ले सध्याच्या वर्तुळाकार स्टाईल अपडेट्सची जागा घेईल. हे अपडेट, व्हॉट्सअ‍ॅप डिझाईन लँग्वेजला मेटाच्या फेसबुकसारख्या इतर उत्पादनांसह अलाईन करतं.

हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, हा बदल अद्याप विकासाच्या टप्प्यात आहे. अ‍ॅपच्या भविष्यातील रिलीझमध्ये त्याचा समावेश असेल, असं अपेक्षित आहे. युजर्सनी नवीन बीटा व्हर्जन इन्स्टॉल केलं तरी त्यांना हा बदल लगेच दिसणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सना लॉक स्क्रीनवरून इतर युजर्सना थेट ब्लॉक करण्याची परवानगी देऊन स्पॅम सिक्युरिटीमध्ये दुप्पट वाढ केली आहे. यामुळे तुम्हाला एखाद्या युजरला ब्लॉक करण्यासाठी विविध सबमेनू आणि चॅट शोधण्याचा व ते उघडण्याचा अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही.

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सना पर्सनल मेसेजेस लपवण्यासाठी ते लॉक करण्याचा पर्याय काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा या फीचरमध्ये मोठे अपग्रेड झाले. या अपग्रेडनुसार, युजर एका विशेष सिक्रेट कोडच्या मदतीने आपलं पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप चॅट लॉक करू शकतील. हा सिक्रेट कोड टाकल्यानंतरच चॅट ओपन होईल. मेसेजेसची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त व्हॉट्सअ‍ॅप मेंसेजरचा वापर होतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फक्त मेसेजच नाही तर ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोजचीही अगदी सहजपणे देवाण-घेवाण करता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here