लॉटरी जिंकण प्रत्येक व्यक्तीसाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं असतं. असंच काहीसं अमेरिकेतील जॉन चीक्स नावाच्या व्यक्तीसोबत घडलं. जेव्हा त्याला समजलं की, त्याने एक दिवसाआधी खरेदी केलेल्या लॉटरी तिकीटमध्ये 2800 कोटी रूपये जिंकले.
पण हे स्वप्न लवकरच मातीत मिसळलं. कंपनीने त्याला सांगितलं की, विजेत्यांच्या लिस्टमध्ये त्याचं नाव चुकीने आलं.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणाऱ्या जॉनने सहा जानेवारी 2023 ला लॉटरी कंपनी ‘पावरबॉल’ ची एक लॉटरी तिकीट खरेदी केली होती. दुसऱ्या दिवशी त्याने कंपनीच्या वेबसाईटवर लॉटरीचा नंबर चेक केला, यावर विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. तो तिकिटाचा नंबर बघून आनंदी झाला आणि दुसऱ्या दिवशी कंपनीच्या ऑफिसमध्ये जिंकलेली रक्कम घेण्यासाठी गेला.
जॉन जिंकलेल्या रकमेची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला. पण तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, तो लॉटरी जिंकला नाही आणि लॉटरीचं तिकीट त्याने कचऱ्यात फेकावं. तिथे असलेल्या एका एजंटने सांगितलं की, हे तिकीट फेकून दे. तुला काही पैसे मिळणार नाहीत. हे ऐकून जॉनला धक्का बसला.
कंपनीवर केस केली दाखल
जॉनने पुढे सांगितलं की, लॉटरीचं तिकीट फेकण्याऐवजी त्यांने कंपनीविरोधात केस दाखल करण्याचं ठरवलं. कारण त्याला विश्वास आहे की, त्याने 340 मिलियन डॉलर म्हणजे 2, 800 कोटी रूपयांची लॉटरी जिंकली. पण कंपनीने देण्यास नकार दिला. कंपनीने सांगितलं की, काहीतरी गडबड झाल्यामुळे त्याच्या तिकिटाचा नंबर दिसत आहे.
जॉनने ‘पावरबॉल फर्म’ कडे लॉटरीच्या जॅकपॉटच्या बरोबरीत नुकसान भरपाई मागितली. त्याशिवाय त्या रकमेवर व्याजाचीही मागणी केली. त्याने कंपनी कंपनीवर आठ वेगवेगळ्या केस दाखल करण्याचा निर्णय घेतला. आता त्याचा निकाल येणं बाकी आहे. लवकरच यावर निकाल जाहीर होईल.