पीनट बटरहा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा नाश्ता आहे. हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानले जाते आणि चविष्ट देखील आहे. यामुळेच भरपूर एनर्जी देणारे पीनट बटर तरुणाईची पहिली पसंती बनले आहे.
पीनट बटर हे अनेक जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, निरोगी चरबी आणि खनिजांचे भांडार आहे. हे खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. यामुळेच याच्या सेवनाने वजन कमी होते. हे रक्तातील साखर कमी करते आणि हृदयाला अनेक आजारांपासून वाचवते. मात्र, शेंगदाण्यापासून बनवलेला हा पदार्थ खाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
पीनट बटर खाण्याची योग्य वेळ
पीनट बटर खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु पीनट बटर कधी खावे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. साधारणपणे लोकांना नाश्त्यात ब्रेडसोबत पीनट बटर खायला आवडते. पण आयुर्वेदानुसार पीनट बटर खाण्याची ही योग्य वेळ नाही. तज्ञांच्या मते, लोक सहसा सकाळी 6 ते 10 च्या दरम्यान नाश्ता करतात आणि याच वेळेत पीनट बटर खातात. परंतु असे केल्याने कफ दोष होण्याची शक्यता असते. सकाळी तेल आणि चरबीयुक्त शेंगदाणे खाणे टाळावे. त्याऐवजी, तुम्ही ते दिवसाच्या इतर कोणत्याही जेवणात समाविष्ट केले पाहिजे. तुम्ही व्यायाम केल्यानंतरही याचा डाएटमध्ये समावेश करू शकता.
फायदे काय?
पीनट बटर आरोग्यासाठी हानिकारक आहे असे नाही, पण त्याचे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला पीनट बटर खाण्याचे अनेक फायदे होतील.
मधुमेहावर नियंत्रण राहील
मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना आरोग्यदायी गोड खाण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी पीनट बटर हा पर्याय असू शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवून मधुमेहाचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून पाच किंवा त्याहून अधिक वेळा पीनट बटर खातात त्यांना मधुमेहाचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो.
कॅन्सरचा धोका कमी
पीनट बटरमध्ये रेझवेराट्रोल आणि फायटोस्टेरॉलसारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. म्हणूनच पीनट बटर कॅन्सरसारख्या धोकादायक आजाराशी लढायला मदत करते. एका अभ्यासानुसार, यामध्ये असलेले संयुगे कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी करतात.
फोकस वाढवते
कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि यासाठी पीनट बटर उपयुक्त ठरू शकते. अभ्यासानुसार, पीनट बटरमध्ये असलेले पोषक आणि फोकस वाढवण्यास मदत करते.
हृदय निरोगी राहील
ओमेगा 3 फॅटी ऍसिडमध्ये भरपूर पीनट बटर तुमचे हृदय निरोगी ठेवते. हे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. शेंगदाण्यामध्ये आर्जिनिन नावाचे नैसर्गिक अमीनो ऍसिड असते जे रक्तवाहिन्या मजबूत करते, ज्यामुळे हृदयातील रक्त परिसंचरण सुधारते